शशी वैद्य मेमोरियल आंतर क्‍लब टेनिस स्पर्धा; पीवायसी ईगल्स, डेक्‍कन अ, संघांचे विजय

पुणे – सातव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्‍लब टेनिस अजिंक्‍यपद टेनिस स्पर्धेत पीवायसी ईगल्स, डेक्‍कन अ, फर्ग्युसन कॉलेज अ, महाराष्ट्र मंडळ, सोलारिस आरपीटीए या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून आगेकूच केली. पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटनेतर्फे (पीएमडीटीए) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्लेट डिव्हिजन गटात पहिल्या सामन्यात चकोर गांधी, मिलिंद केळकर, संतोष कटारिया, मोहन भंडानी, लक्ष्मीकांत चोभे, प्रकाश चंडोकर, सतीश भगत, राहुल गांगल यांनी केलेल्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी ईगल्स संघाने सोलारिस क संघाचा 24 -9 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. दुसऱ्या लढतीत सोलारिस आरपीटीए संघाने विनिंग एज क संघाचा 24 -3 असा धुव्वा उडविला.

आणखी एका लढतीत डेक्‍कन अ संघाने एमडब्लूटीए क संघाचा 24-3 असा सहज पराभव केला. विजयी संघाकडून अजय कामत, अमित पाटणकर, मंदार वाकणकर, ह्रषिकेश पाटसकर, जयदीप दाते, मदन गोखले, संग्राम चाफेकर, विक्रांत साने यांनी अफलातून कामगिरी केली. तसेच अन्य लढतींमध्ये फर्ग्युसन कॉलेज अ संघाने विनिंग एज ब संघाचा 24-6 असा फडशा पाडला. तर महाराष्ट्र मंडळ संघाने विनिंग एज अ संघाचा 19-13 असा संघर्षपूर्ण पराभव केला.

सविस्तर निकाल-

साखळी फेरी- पीवायसी ईगल्स वि.वि. सोलारिस क 24 -9 (100+ गट- चकोर गांधी-मिलिंद केळकर वि.वि. रवी भोंडेकर-संभाजी शिंदे 6-4; खुला गट- संतोष कटारिया-मोहन भंडानी वि.वि. मंदार काळे-हेमंत निकम 6-1; 90+ गट- लक्ष्मीकांत चोभे-प्रकाश चंडोकर वि.वि. राजेंद्र पवार-संजय अगरवाल 6-4; खुला गट- सतीश भगत-राहुल गांगल वि.वि. संतोष साटम-श्रीकांत पवार 6-0;

डेक्‍कन अ वि.वि. एमडब्लूटीए क 24-3 (100+ गट- अजय कामत-अमित पाटणकर वि.वि. रिझवान शेख-राम मोहन एस 6-0; खुला गट- मंदार वाकणकर-ह्रषिकेश पाटसकर वि.वि. पार्थ एम-विक्रम गोलाणी 6-2; 90+ गट- जयदीप दाते-मदन गोखले वि.वि. संजय आशर-राहुल सिंह 6-1; खुला गट- संग्राम चाफेकर-विक्रांत साने वि.वि. अंकित दोगा-रिझवान शेख 6-0;

फर्ग्युसन कॉलेज अ वि.वि. विनिंग एज ब 24-6 (100+ गट- पुष्कर पेशवा-राजीव जोशी वि.वि. शशी जोशी-शैलेश हियोगी 6-4; खुला गट- सचिन साळुंके-गणेश देवखिळे वि.वि. बाळासाहेब पवार-विठ्ठल गोर्डे 6-2; 90+ गट- शंभू तावरे-पंकज यादव वि.वि. सचिन फामसलकर-अजय आपटे 6-0; खुला गट- सुमित सातोस्कर-आदित्य अभ्यंकर वि.वि. सचिन कुलकर्णी-सुनील आहिरे 6-0);

महाराष्ट्र मंडळ वि.वि. विनिंग एज अ 19-13 (100+ गट- संजय सेठी-हरीश सिरीपाल पराभूत वि. उदय टेकाळे-नीलेश नाफडे 1-6; खुला गट-अभिषेक चव्हाण-विक्रम शिरीषमळ वि.वि. गंगा प्रसाद-अविनाश पवार 6-3; 90+ गट: कमलेश शहा-विलास बचलू वि.वि. मंदार कापशीकर-मुकेश देशपांडे 6-3;खुला गट- संजय सेठी-अर्पित श्रॉफ वि.वि. आदित्य टेकाळे-आशुतोष सोवनी 6-1);

सोलारिस आरपीटीए वि.वि. विनिंग एज क 24 -3 (100+ गट- संजीव घोलप-राजेंद्र देशमुख वि.वि. जय कुलकर्णी-मनीष कोठवकर 6-3; खुला गट- सिंधू भरमगोंडे-हेमंत भोसले वि.वि. गुरुराज के.-मंदार नगरकर 6-0; 90+ गट- रवी कात्रे-सचिन खिलारे वि.वि. प्रशांत के.-साकेत वेलसीन 6-0; खुला गट- रवी पांडे-संजीव घोलप वि.वि. मनीष के.-राहुल उप्पल 6-0).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)