शशिकला यांचा पतीच्या अंत्यसंस्कारासाठी 15 दिवसांचा पॅरोल मंजूर

तामिळनाडू: बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी तुरुंगात असलेल्या आणि अण्णा द्रमुकमधून बडतर्फ करण्यात आलेल्या व्ही. के. शशिकला यांना त्यांचे पती एम. नटराजन यांच्यावरील अंत्यसंस्कारासाठी 15 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. काही वेळापूर्वीच बंगळुरूच्या तुरुंगातून त्यांना सोडण्यात आले.

दरम्यान, शशिकला थेट तंजावर जिल्ह्यातील आपल्या मूळगावी जाणार आहेत. याठिकाणी एम. नटराजन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. एम. नटराजन यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. एम. नटराजन यांच्यावर चेन्नईतील ग्लेनीगल्स ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. गेल्या रविवारी त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

एम. नटराजन यांची प्रकृती खालवल्याने त्यांना सोमवारी दुपारी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती उपचारांना साथ देऊ न शकल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. ग्लेनीगल्स ग्लोबल हॉस्पिटलने एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, अनेक अवयव निकामी झाल्याने एम. नटराजन यांचे निधन झाले. तसेच, गेल्या वर्षी त्यांच्यावर किडनी आणि यकृत प्रत्यारोपण करण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)