शशिकलांची पक्षप्रमुखपदावरून हकालपट्टी होणार?

अद्रमुकच्या जनरल कौन्सिलची लवकरच बैठक

चेन्नई- मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील अद्रमुक पक्षाने पक्षाच्या जनरल कौन्सिलची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला असून त्यात पक्षाच्या सरचिटणीसपदावरून शशिकला यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

पलानी स्वामी आणि पनीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही गटांचे एकत्रिकरण झाल्यानंतर शशिकलांना पक्षातूनच हटवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान तिकडे दिनकरण यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या दुसऱ्या गटाकडून विरोधी गटांतील नेत्यांच्या हकालपट्टीचा सिलसिला आजही सुरूच राहिला.

जयललिता यांचे निधन झाल्यानंतर गेल्या वर्षी 29 डिसेंबर रोजी झालेल्या अद्रमुकच्या बैठकीत शशिकला यांना पक्षाच्या सरचिटणीसपदी हंगामी स्वरूपात नेमण्यात आले होते. त्यामुळे जनरल कौन्सिलच्याच बैठकीत त्यांना यापदावरून हटवण्याचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. आज पलानीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या नेत्यांची एक बैठक घेण्यात आली त्यात हे ठरवण्यात आले. या बैठकीला बहुतांशी आमदार आणि खासदार उपस्थित होते. त्यात दिनकरण गटातील हालचालींचाही आढावा घेण्यात आला.

दिनकरण यांनी काल थेट मुख्यमंत्री पलानीस्वामी यांचीच सालेम जिल्हा सेक्रेटरीपदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या गटातील आमदारांची संख्या आता 21 झाल्याने पक्षाच्या बहुमताविषयीच आता शंका उपस्थित केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)