शर्मिला टागोर यांच्यासमोर नतमस्तक झाला बादशहा

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान हा चित्रपटाच्या सेटवर असो किंवा वैयक्तिक आयुष्य नेहमी महिलांप्रती आदर व्यक्त करत असतो. सध्या सोशल मीडियावर शाहरूखचा एक फोटो व्हायरल होत असून तो यात बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीसमोर गुडघ्यावर बसलेला दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोत तो ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या समोर गुडघ्यावर बसून त्यांच्याशी काहीतरी बोलताना दिसत आहे. शाहरूखचे करीश्‍मा कपूर, माधुरी दिक्षित, करीना कपूर यांच्यासोबतचे फोटोही काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

सध्या आपल्या आगामी “झिरो’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये शाहरूख व्यस्त असून या चित्रपटाचे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमोशन करण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ व अनुष्का शर्मा दिसणार आहेत. या तिघांनी यापूर्वी “जब तक है जान’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. 21 डिसेंबरला शाहरूखचा “झिरो’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)