शरीफ कुटूंबीयांसाठी आणखी एक बॅड न्युज

लंडन पोलिसांकडून नवाज यांच्या दोन नातवांना अटक
लंडन – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या दोन नातवांना लंडन पोलिसांनी अटक केली. निदर्शकाला मारहाण केल्याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे शरीफ कुटूंबीयांसाठी आणखी एक बॅड न्युज येऊन थडकली.

शरीफ कुटूंबीय लंडनमधील एव्हनफिल्ड हाऊस या इमारतीत राहतात. त्या इमारतीपुढे नवाज यांच्या विरोधकांनी निदर्शने केली. त्यावेळी जुनैद सफदर आणि झकेरिया या नवाज यांच्या नातवांनी एका निदर्शकाला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यावरून लंडन पोलिसांनी दोघांना अटक केली. जुनैद हा नवाज यांची कन्या मरियमचा तर झकेरिया हा हुसेन नवाज यांचा पुत्र आहे.

दरम्यान, जुनैदने निदर्शकांवर थुंकल्याचा आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. नवाज आणि मरियम यांना भ्रष्टाचारप्रकरणी पाकिस्तानी न्यायालयाने अनुक्रमे दहा आणि सात वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. त्यावरून शरीफ कुटूंबीयांविरोधात पाकिस्तानी वंशाच्या काही नागरिकांनी लंडनमध्येही निदर्शने केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)