शरीफपुत्रांचा समावेश काळ्या यादीत; पासपोर्ट स्थगित

इस्लामाबाद – तुरूंगात असणारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कुटूंबीयांच्या अडचणींत आणखी भर पडली आहे. पाकिस्तानी यंत्रणांनी शरीफ यांच्या दोन मुलांचा समावेश काळ्या यादीत केला आहे. त्यांचे पासपोर्ट स्थगित करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना विमानप्रवास करणे मुश्‍किल बनणार आहे.

हसन आणि हुसेन हे शरीफपुत्र सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. भ्रष्टाचाराच्या तीन प्रकरणांत त्यांना शरीफ यांच्यासह आरोपी करण्यात आले आहे. त्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी हजर न राहिल्याने त्यांना याआधीच पाकिस्तानी न्यायालयाने फरार घोषित केले आहे.

-Ads-

याशिवाय, त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी त्यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटिसा जारी व्हाव्यात या उद्देशाने पाकिस्तानी यंत्रणांनी याआधीच इंटरपोलला साकडे घातले आहे. आता त्यांच्या हालचालींवर निर्बंध येण्यासाठी पाकिस्तानी यंत्रणांनी आणखी पुढचे पाऊल उचलले आहे. मागील महिन्यात पाकिस्तानी न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात शरीफ, त्यांच्या कन्या मरियम आणि जावई सफदर यांना दोषी ठरवत तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली. त्यानंतर ते तिघेही सध्या तुरूंगात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)