शरयु नदीच्या किनारी रामाचा पुतळा उभारणार 

लखनौ: गुजरातेत सरदार पटेल यांचा पुतळा उभारण्यात आल्यानंतर त्याच धर्तीवर आता अयोध्येच्या शरयु नदीच्या तिरावर रामाचा भव्य पुतळा उभारण्याची योजना भाजप आखत असल्याची महिती उत्तर प्रदेशातील भाजप नेत्याने दिली.
अयोध्या महापालिकेचे महापौर श्रृषिकेश उपाध्याय यांनी पीटीआयला ही माहिती दिली. ते म्हणाले की 151 मीटर पुतळा उभारण्याची ही योजना असून देव दिवाळीच्यावेळी या प्रकल्पाची घोषणा केली जाणार आहे.

स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे याची घोषणा करतील अशी माहितीही त्यांनी दिली. ते म्हणाले की तुलसीदास घाटाजवळ हा पुतळा उभारण्याची योजना आहे. त्याखेरीजही अन्य दोन जागा विचारार्थ असून या तिन्ही या जागांची पहाणी करून अधिकारी यातील एक जागा निश्‍चीत करतील असे ते म्हणाले. अयोध्या ही रामाची नगरी असून तेथे असाच भव्य पुतळा उभारून भगवान रामाचे मोठे स्मारक बनवण्याच्या संबंधातील बातमी राम भक्तांना दिवाळीच्या पर्वातच मिळेल असेही ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)