शरद यादव यांच्या जागी आरसीपी सिंहांची नियुक्ती

नवी दिल्ली – नितीश कुमार यांच्यावर नाराज असलेले जदयूचे वरिष्ठ नेते शरद यादव यांची जदयू संसदीय दलाच्या नेतेपदावरून हकालपट्टी झाली आहे. त्यांच्या जागी आरसीपी सिंह यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
जेडीयू प्रमुख नितीश कुमार यांनी याविषयी माहिती दिली होती. शरद यादव यांनी त्यांना पाहिजे तिथे जावे, पक्षाने आपला निर्णय घेतला असल्याचे म्हटले होते. तर दुसरीकडे, अमित शहा यांनी नितीश यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिलेले अाहे. शहा यांनी त्यांना दिल्लीतील आपल्या घरी चहापानावर बोलावले. दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. तत्पूर्वी, नितीश यांनी 28 जुलैला राजद-काँग्रेस महाआघाडीमधून स्वत:ला वेगळे केल्यानंतर बिहारमध्ये भाजपसह नवे सरकार स्थापन केले. 4 वर्षांनंतर नितीश कुमार यांनी पुन्हा एनडीएमध्ये पुनरागमन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)