शरद यादव गटाच्या नव्या पक्षाची घोषणा

लोकतांत्रिक जनता दल असे नाव
नवी दिल्ली – संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) बंडखोर नेते शरद यादव यांच्या समर्थकांनी आज नव्या पक्षाची घोषणा केली. लोकतांत्रिक जनता दल (एलजेडी) असे नाव पक्षाला देण्यात आले आहे.

येथे झालेल्या पत्रकार परिषदेत नव्या पक्षाची घोषणा करण्यात आली. यावेळी स्वत: यादवही उपस्थित होते. मात्र, त्यांनी अजून नव्या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारलेले नाही. यादव यांनी जेडीयूवर दावा सांगितला आहे. ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याने यादव तूर्त तांत्रिकदृष्ट्या नव्या पक्षापासून दूर राहणार आहेत. अर्थात, मार्गदर्शक या नात्याने ते नव्या पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे जेडीयूचे अध्यक्षपद आहे.

नितीश यांनी काही महिन्यांपूर्वी राजद आणि कॉंग्रेसची साथ सोडून बिहारमध्ये सरकार स्थापनेसाठी भाजपशी युती केली. तो निर्णय न रूचल्याने शरद यादव आणि त्यांच्या समर्थकांनी बंडाचे निशाण फडकावले. त्यातून जेडीयूमध्ये फूट पडली. आता एलजेडीच्या घोषणेने जेडीयूच्या फुटीवर औपचारिक शिक्कामोर्तब झाले आहे.
भुतियाचाही नवा पक्ष

भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया यानेही नव्या राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली. हमरो सिक्कीम पार्टी असे त्याच्या पक्षाचे नाव आहे. त्याचा पक्ष सिक्कीममध्ये कार्यरत राहील. तृणमूल कॉंग्रेसच्या माध्यमातून भुतिया पश्‍चिम बंगालच्या राजकारणात सक्रिय झाला. तृणमूलच्या तिकिटावर त्याने विधानसभेची निवडणूकही लढवली. मात्र, त्याला अपयश आले. तृणमूलमध्ये माझ्यावर नेहमीच बाहेरचा असा शिक्का मारला गेला. त्यामुळे आता मी मूळस्थानी (सिक्कीम) परतत असल्याचे त्याने नमूूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)