‘शरद पवार साहेबांच्या विचारांना नेहमीच साथ दिली’

नाशिक: नाशिक जिल्ह्याचा अनेक वर्षांचा इतिहास पाहिला, तर या जिल्ह्याने आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांना नेहमीच साथ दिली आहे. पवारसाहेबांना नाशिकच्या शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा आहे. पक्षाची नाशिक जिल्ह्यातली ताकद वाढवण्यासाठी आ. छगन भुजबळ साहेब मोठे पाऊल टाकणार होते, त्यांच्या त्या वाक्याची प्रचिती आज या कार्यक्रमातून आली, असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

प्रशांत आणि अपूर्व हिरे यांच्या पक्षप्रवेशानंतर ते बोलत होते. या पक्षप्रवेशानंतर नाशिक जिल्ह्यतली कामं तसेच जनसामान्यांच्या समस्या सोडवण्यास अजून वेग येईल याची खात्री त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महाराष्ट्रात एक लाख ८७ हजार नव्या कार्यकर्त्यांची नोंद केली आहे. सक्रीय झालेले हे कार्यकर्ते ही पक्षाची ताकद आहे आणि ती निवडणुकीत उपयुक्त ठरेल, यात वादच नाही. हिरे यांच्या घरवापसीमुळे नाशिक जिल्ह्यात आपली ताकद निश्चितच वाढली आहे, असे पाटील म्हणाले.

What is your reaction?
3 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)