शरद पवार, राहुल गांधींची जागावाटपावर चर्चा

मुंबई – कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरूवारी दिल्लीत महत्वाची बैठक झाली. त्या बैठकीत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जागावाटपावर चर्चा झाली.

शक्‍य तितक्‍या लवकर जागावाटप निश्‍चित करण्याचा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यातून जागावाटपाला गती देण्यासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, अशोक गेहलोत आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षांच्या अध्यक्षांची बैठक झाली, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

-Ads-

राष्ट्रवादीने 50:50 जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्या प्रस्तावावर कॉंग्रेस प्रदेश पातळीवर चर्चा करेल, असे राहुल यांनी बैठकीत सांगितल्याचेही त्यांनी म्हटले. राष्ट्रवादीचा प्रस्ताव कॉंग्रेसला मान्य होणार का, याबाबत अजून कुठले संकेत मिळालेले नाहीत. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. मागील वेळी कॉंग्रेसने 26 तर राष्ट्रवादीने 22 जागा लढवल्या होत्या. त्यावेळी कॉंग्रेसला अवघ्या 2 तर राष्ट्रवादीला 4 जागांवर विजय मिळाला.

दरम्यान, पवार यांनी शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक घेतली. त्या बैठकीत राष्ट्रवादी आगामी लोकसभा निवडणुकीत लढवण्यात उत्सुक असणाऱ्या जागांबाबत चर्चा झाली. याशिवाय, संभाव्य उमेदवारांविषयीही चर्चा झाल्याचे समजते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
9 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)