शरद पवार यांची पिंपरी सांडस येथे सदिच्छा भेट

वाघोली- पेरणे वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटातील पिंपरी सांडस, (ता. हवेली) या ठिकाणी अमित शिंदे यांच्या आधुनिक पध्दतीने दर्जेदार देशी म्हशींचे संगोपन करणाऱ्या गोठ्याला आज शरद पवार यांनी सदिच्छा भेट दिली.
शरद पवार आणि शेती हे समीकरण महाराष्ट्रात आणि देशात गेले पन्नास वर्षे आपण अनुभवत आहोत. शेतीसंदर्भात पवारांचा गाढा अभ्यास पाहता नवनवीन प्रयोग आणि कल्पना प्रत्यक्षात राबवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची कदर त्यांच्याकडून कायमच होत असते. पुण्यासारख्या शहरात राहून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसायाची प्रचंड आवड असलेले अमित दत्तात्रय शिंदे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब यांनी पिंपरी सांडस येथे सात एकर जमिनीपैकी तीन एकरमध्ये देशी म्हशींचे आधुनिक पध्दतीने संगोपन करत दररोज हजारो लिटर दर्जेदार दुधाचे उत्पादन स्वयंचलित पध्दतीने फक्त वीस कामगारांच्या मदतीने घेत आहेत. हे सर्व दूध आपल्या स्वतःच्या चंदननगर येथील डेअरीवर व उर्वरीत इतर ठिकाणी वितरीत केले जाते. शिंदे कुटुंबियांनी दुग्धव्यावसामध्ये केलेले नवनवीन प्रयोग पाहण्याचा योग पवार यांच्या उपस्थितीत मान्यवरांसह शिंदे कुटुंबियांना लाभला.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या, आमदार बापुसाहेब पठारे, विलास लांडे, नगरसेवक काटे, योगेश बहल, संजोग वाघिरे, हवेली पंचायत समितीचे सदस्य आणि अष्टापुरचे सरपंच सुभाष जगताप, विद्यमान जिल्हा परिषद सदस्या कल्पना जगताप, पंचायत समिती सदस्य राजू पठारे, पिंपरी सांडसचे सरपंच राजू भोरडे, हिंगणगावचे सरपंच कुंडलिक थोरात, ग्रामस्थ नेते मंडळी आणि शिंदे कुटुंबिय उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)