शरद पवारांचे वक्तव्य फार काळ टिकणारे नाही – संजय राऊत

मुंबई – राफेल प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा यांना आशादायी वाटेल असे वक्‍तव्य केलेले असले तरी ते फार काळ टिकणारे नाही. शिवसेनेने या प्रकरणात कोणालाही क्‍लिनचीट दिलेली नाही. शिवसेना लोकभावनेसोबत आहे, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडली.

एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. गेल्या चार वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा व्यक्‍तीशः अडचणीत येतात तेव्हा शरद पवार त्यांच्या बाजूने नाही तरी मध्यम भूमिका घेत वक्‍तव्य करतात, असे दिसून आले आहे. आता देखील त्यांच्या वक्‍तव्यातून दिसत असलेला सूर भाजपासाठी आशादायी वाटत असला तरी तो फार काळ टिकणारा नाही. शिवसेनेने अद्याप तरी कुठलीही वेगळी भूमिका घेतलेली नाही वा कोणालाही क्‍लिनचीट दिलेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हे प्रकरण अद्याप प्राथमिक अवस्थेत आहे. चौकशीची मागणी होत आहे. काही जण संयुक्‍त संसदीय समितीमार्फतही चौकशीची मागणी करत आहेत, असेही संजय राउत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)