शरद पवारांचे नातू राम शिंदेच्या विरोधात निवडणूक लढविणार

जवळा – आज मतदारसंघात संवाद साधण्यासाठी आलो आहे. लवकरच चर्चेसाठी येणार आहे. त्यावेळी मोठी सभा घेऊ, असे सांगत शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. कर्जत – जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवाल का असे विचारले असता, पक्षाने जबाबदारी व संधी दिली तर कार्यकर्ता म्हणून मी ती नक्कीच पुढे नेईन, असेही सुचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले.

पवार घराण्यातील चौथ्या पिढीचे राजकीय नेतृत्व करत असलेले पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार हे जामखेड तालुक्‍यातील चोंडी दौऱ्यावर आले होते. यावेळी आयोजीत कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. विकासाचा मुद्दा घेऊन भाजपा शिवसेना युतीचे सरकार सत्तेवर आले पण मागील साडेचार वर्षात जनतेला नुसते आश्‍वासनांचे गाजर देण्याचे काम या सरकारने केले आहे. विद्यमान सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरकारविरोधी जनमत तयार होऊ लागल्याने जाती जातीत, धर्मा – धर्मात तेढ निर्माण करण्याचे उद्योग सरकारने सुरू केले आहेत. राज्यात व देशात भाजपाची पुन्हा सत्ता आल्यास समतेचा विचार हरवेल असे सांगत समतेचा विचार पुढे घेऊन जायचा असेल तर देशात व राज्यात राष्ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीचे सरकार येणे आवश्‍यक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी माजी मंत्री अण्णा डांगे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, पक्ष निरीक्षक किशोर मासाळ, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात, ज्येष्ठ नेते दत्तात्रय वारे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, जिल्हा सरचिटणीस अमजदभाई पठाण, प्रदिप पाटील, दयानंद कथले, युवती जिल्हाध्यक्ष संध्याताई सोनवणे, बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, शहाजी राळेभात, युवक तालुकाध्यक्ष शरद शिंदे, लतिफभाई शेख, बबनराव तुपेरे, राजुभैय्या सय्यद, ओबीसी सेलचे प्रदेश प्रवक्ते कैलास हजारे, नगरसेवक पवन राळेभात, नगरसेवक दिगांबर चव्हाण, नगरसेवक अमित जाधव, सरपंच कृष्णाराजे चव्हाण, सरपंच सरपंच विश्‍वनाथ राऊत, नरेंद्र जाधव, नितीन हूलगुंडे, युवा नेते सतिश चव्हाण सोशल मीडिया तालुकाध्यक्ष काकासाहेब कोल्हे, जिल्हा सरचिटणीस वसंतराव कांबळे, शहाजीराजे राजेभोसले, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकिर, युवक अध्यक्ष नितिन धांडे, दादा धनजी थोरात, अँड सुरेश शिंदे सचिन लाळगे सह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमित जाधव यांनी केले तर आभार अमजद पठाण यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)