शरद पवारांची उपस्थिती ठरली लक्षवेधी

पुणे – ज्येष्ठ नेते शरद पवार “सवाई’ महोत्सवाला उपस्थित राहिले. योगायोगाने त्यावेळी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य आणि सुपुत्र श्रीनिवास जोशी यांचे गाणे सुरू होते आणि त्यांनी मैफिलीचा आस्वाद घेत विशेष दाद दिली. 66 व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील त्यांची “रसिक’ म्हणून लाभलेली उपस्थिती लक्षवेधी ठरली. साहित्य, चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील त्यांची रुची सर्वश्रुत आहे.

नुकत्याच लागलेल्या निवडणुकीच्या निकालाने राजकीय मंडळींना मोकळीक मिळाली आहे. पवार पुणे दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी महोत्सवाला उपस्थित राहून कलाप्रेमी रसिक असल्याची पावती दिली. त्यांनी दोन दिवसांपूर्वी स्वतःच आयोजकांना सवाईला येण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा आयोजकांनीही त्यांच्या इच्छेला मान दिला. मात्र, हा खासगी दौरा असल्याने आयोजकांनी याची वाच्यता कुठे केली नाही, ठरलेल्या वेळेनुसार ते कोणत्याही कार्यकर्त्यांच्या गर्दीशिवाय महोत्सवाला उपस्थित राहिले. यावेळी त्यांच्याबरोबर माजी मंत्री विनायक पाटील, ज्येष्ठ उद्योजक विठ्ठल मणियार, सतीश मगर, महाराष्ट्रीय मंडळाचे धनंजय दामले अशा मोजक्‍याच व्यक्ती उपस्थित होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शरद पवारांच्या हस्ते “भीमसेन स्टुडिओज’ या युट्युब चॅनलचे उद्‌घाटन करण्यात झाले. यावेळी ते म्हणाले, हा उपक्रम म्हणजे एक प्रकारे भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना अभिवादन करणारा आहे. यामाध्यमातून आपल्याला पंडितजींना ऐकता आणि पाहता येईल. पं. भीमसेन जोशींनी नवोदितांना प्रोत्साहन देत, हात धरून संधी दिली आणि त्यांचे नाव जगभरात पोहोचविले. हा उपक्रम सुरू करून त्यांनी अनेक श्रोत्यांचे कान तयार करण्याचे काम केले. पंडितजींच्या अनेक ठिकाणी मैफिली ऐकण्याची संधी मिळाली. पंडितजींचा राग मालकंस, दरबारी ऐकल्यानंतर त्यांचे गाणे संपूच नये असे वाटायचे, असे पवार म्हणाले.

रोपट्याचा वटवृक्ष जगासाठी मार्गदर्शक
30 ते 40 वर्षांपूर्वी सवाईला तिकीट काढून येत होतो आणि मागे बसत होतो, आता मात्र तिकीट न काढता फुकट आलो, असे पवार मिश्‍कीलपणे म्हणाले. हा महोत्सव ऐकण्यात आनंद आहे. महोत्सव रमणबागेतून या जागी स्थलांतरित झाला, याचाही आनंद आहे. आता तो अधिक व्यापक होऊन मंडप वाढवावा लागेल. पंडितजींनी 66 वर्षांपूर्वी लावलेले रोपटे पुढच्या पिढीने वाढवले आणि आता रोपट्याचा वटवृक्ष जगासाठी मार्गदर्शक आहे, असा विश्‍वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)