शरण आलेल्या स्मगलरांकडून चार कोटींचे हेरॉईन जप्त 

जम्मू – जम्मू काश्‍मीरात शरण आलेल्या तीन स्मगलर्सकडून आज पोलिसांनी चार कोटी रूपयांचे मादक द्रव्य जप्त केले. शरण आलेल्या या स्मगलर्समध्ये एका दहशतवाद्याचाही समावेश आहे. त्याचे नाव अली मोहमद उर्फ इशाक असे आहे. तो अल बक्र दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. सोहेल अहमद आणि प्रदीप कुमार अशी शरण आलेल्या अन्य दोन स्मगलर्सची नावे आहेत. त्यांच्याकडे तेरा लाख रूपयांची रोकड आणि एक किलो हेरॉईन सापडले.

या हेरॉईनचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मुल्य चार कोटी 50 लाख रूपये इतके आहे. श्रीनगरातील वाल्मिकी चौकातील वाहन तपासणीच्यावेळी हे तिघे पोलिसांना आढळून आले. अली मोहंमद हा प्रशिक्षीत दहशतवादी असून तो उत्तर कुपवाडा जिल्ह्यात एक केबल नेटवर्क चालवत आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)