शरण आलेले दराडेखोर नेत्यावर नाराज 

मध्यप्रदेश – भूतकाळात डाकू राहिलेल्या मलखान सिंग यांना एकेकाळी चंबळ का आतंकफ म्हटले जायचे. मलखान सिंग हे आज 74 वर्षांचे असून भारदस्त आवाज, लांब केस, कपाळी लाल टिळयासह ते अतिथींचे स्वागत करताना दिसून येतात. जीवनभर मद्यसेवन केले नाही, पान-तंबाखूचे सेवन केले नसल्याने मला चष्मा किंवा नकली दातांची गरज नसल्याचे मलखान सांगतात.

मलखान यांनी 1982 मध्ये आत्मसमर्पण केले होते. सध्या ते स्वतःच्या कुटुंबासोबत गुणा येथील स्वतःच्या शेतजमिनीत शांततेत जगत आहेत. मध्यप्रदेशात निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले असल्याने त्यांचे याबद्दलचे मत निश्‍चितच महत्त्वाचे ठरते.

आजच्या काळातील काही नेतेच खऱ्या अर्थाने डाकू आहेत, ते अत्याधुनिक डाकू आहेत. आम्ही बंडखोर होते, डाकू नव्हतो. आमची लढाई प्रामाणिकपणाची होती असे मलखान यांनी म्हटले आहे. भूमी वादात स्थानिक अधिकाऱ्यांकडून छळ झाल्याने मलखान यांनी बंडखोरी पत्करली होती.

मजूर आणि शेतकऱयांचे अधिकार तसेच जातींमुळे अपमानित लोकांच्या अधिकाऱयांसाठी आम्ही लढलो. सद्यकाळातील नेत्यांकडील पैसा पाहिल्यास त्यांच्याच घरात चलन छापले जाते असेच वाटू लागते असे उद्गार त्यांनी काढले आहेत.
डाकू होण्याअगोदर मलखान हे महाकालीचे भक्त होते आणि त्यांना देवीचे मंदिर उभे करायचे होते. परंतु जातीय भेदभावापोटी त्यांना मंदिर उभारणीपासून रोखण्यात आले. तेव्हा नेते आणि अधिकाऱ्यांनी विश्वासघात केल्यानेच लोक बंडखोर झाल्याचे मलखान मानतात.

1981 मध्ये पोलिसांसोबतच्या चकमकीत अन्य कुप्रसिद्ध चंबळमधील डाकू पान सिंग तोमर यांच्या हत्येनंतर त्यांचा पुतण्या बलवंत सिंग तोमर टोळीचा प्रमुख झाला होता. राजकारण्यांबद्दल त्यांचे विचार देखील मलखान यांच्याप्रमाणेच आहेत. शेतकऱयांसाठी कोणताही न्याय नाही कारण अधिकाऱ्यांकडेच अधिक शक्ती आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्षांचे नेहमीच राजकीय नेत्यांशी संबंध असतात आणि शेतकऱऱ्यांचा दाम ते हडपत असल्याचा आरोप बलवंत करतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)