शबरीमाला वाद : खासदाराच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

तिरुवनंतपुरम – दोन महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ केरळमध्ये हिंसाचार उफाळला आहे. शुक्रवारी रात्री उशिराने सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षा(एम) चे नेते आणि खासदार ए. एन शमसीर यांच्यासह अन्य नेत्यांच्या घरावर बॉम्ब हल्ले करण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, कन्नूरस्थित मडपीडिकायिल येथील शमसीर यांच्या घरावर काही अज्ञात दुचाकीस्वारांनी बॉम्ब फेकले. हल्ल्यावेळी शमसीर निवासस्थानी नसल्याने अनर्थ टळला. शमसीर यांच्याव्यतिरिक्त सीपीआयचे माजी जिल्हा सचिव पी. शशि यांच्या निवासावरही बॉम्बहल्ले करण्यात आले. या हल्ल्यानंतर शमसीर म्हणाले कि, राज्यात हिंसा भडकविण्याची ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, केरळमध्ये हिंसाचार वाढत असून आतापर्यंत १७१८ लोकांना पोलिसांनी अटक केली आहे,


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)