शबरीमाला प्रकरण : तृप्ती देसाईंना विमानतळावरच अडवले 

तिरुअनंतपुरम – सर्वोच्च न्यायालयाने महिलांच्या प्रवेशाचे आदेश दिल्यानंतरही त्याविरोधात होणाऱ्या आंदोलनातच केरळमधील सुप्रसिद्ध भगवान अय्याप्पा मंदिराचे दरवाजे उद्या उघडणार आहेत. यावेळी शबरीमाला मंदिरात प्रवेश मिळवण्याच्या हेतूने भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई या कोच्चीच्या विमानतळावर पोहचल्या आहेत. परंतु, विमानतळावर तृप्ती देसाईंना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे. विमानतळाबाहेर आंदोलक मोठ्या संख्येने जमा झाले असून त्यांना विमानतळाच्या आतच थांबावे लागले आहे. तृप्ती देसाईंनी ‘मंदिर प्रवेश केल्याशिवाय माघारी जाणार नाही’, असा निर्धार केला आहे. तर तृप्ती देसाई आणि सहकाऱ्यांना विमानतळाबाहेर पडू देणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.

दरम्यान, शबरीमला मंदिरात शनिवारपासून “मंडला मकरविल्लक्कु’ उत्सव सुरू होत आहे. यानिमित्त भगवान अयप्पा मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या उत्सवानिमित्त तृप्ती देसाई यांनी शबरीमला मंदिराला भेट देणार असल्याचे सांगितले. याबाबत त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना पत्र लिहून त्यांनी संरक्षण देण्याची मागणी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)