शबरीमला विषयाचा भाजपकडून राजकारणासाठी वापर 

केरळच्या मुख्यमंत्र्यांचा आरोप

थिरूवनंतपुरम – केरळातील शबरीमला मंदिर प्रकरणाचा भाजप आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना राजकारणासाठी वापर करीत आहेत असा आरोप त्या राज्याचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी केला आहे. या प्रकरणावरून जनतेने जे आंदोलन सुरू केले आहे त्यावर स्वार होण्याचा व त्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे असे त्यांनी म्हटले आहे. कारसेवक पाठवून अयप्पा मंदिरावर ताबा मिळवण्याचाही त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. शबरीमला मंदिराच्या भाविकांना आपल्या राजकारणाचा बळीचा बकरा बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि भाविकांनी तो हाणून पाडला पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.

आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. या विषयावरून भाजप आणि कॉंग्रेसची हातमिळवणी झाली असल्याचा दावाही त्यांनी केला. कालच अमित शहा यांनी या प्रकरणाच्या हातळणीवरून राज्यातील डाव्या आघाडीच्या सरकारवर टीका केली होती त्याचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की या विषयाचे राजकारण करून राज्यात हिंसाचार माजवण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही आणि त्यांना शबरीमला मंदिर हा राजकारणाचा केंद्र बिंदु करू देणार नाहीं.

कॉंग्रेस मध्येही या विषयावरून दुफळी आहे असे नमूद करून ते म्हणाले की कॉंग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांना शबरीमला प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी असे वाटते आहे पण केरळातील प्रदेश कॉंग्रेस मात्र या निर्णयाला विरोध करीत आहे असे ते म्हणाले. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते रमेश चेन्नीथला यांनी या विषयावर सातत्याने आपली भूमिका बदलली आहे त्यामुळेच संघ आणि भाजपला येथे राजकारण करण्याची संधी मिळाली आहे असे ते म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)