शबरीमला वाद : केरळमध्ये बंद; एका आंदोलकाचा मृत्यू

तिरुवनंतपुरम – केरळमधील शबरीमला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्याने शेकडो वर्षांची परंपरा खंडित झाली. या पार्श्वभूमीवर आज केरळमध्ये राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. शबरीमाला कृती समितीअंतर्गत विविध हिंदुत्ववादी संघटना बंद पुकारला आहे. दरम्यान, यामध्ये एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेशाची परवानगी दिली होती. परंतु, अयप्पाच्या भक्तांकडून महिलांना प्रवेश नाकारला जात होता. मात्र, मंदिरात प्रवेश करण्याला होत असलेला विरोध डावलीत दोन महिलांनी शबरीमला मंदिरात भगवान अयप्पाचे दर्शन घेतले. याविरोधात केरळमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त होऊन यामध्ये एका भाजप आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सीपीआय (एम) च्या दोन कार्यकर्त्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक प्रभावित झाली आहे. भाजप अध्यक्ष पी. एस. पिल्लाई यांनी कायद्याचे पालन करुन शांततेत आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)