शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी केरळमध्ये मोठे आंदोलन

पोलिसांकडून बळाचा वापर; 68 जण ताब्यात

शबरीमला – केरळमधील शबरीमला मंदिरामध्ये महिलांच्या प्रवेशाला विरोध करण्यासाठी भाजप, युवा मोर्चा आणि काही उजव्या विचारसरणीच्या गटांनी काल रात्री केरळमध्ये ठिकठिकाणी आंदोलन केले. अय्यप्पा मंदिराच्या परिसरामध्ये पोलिसांनी बळाचा वापर करून 68 आंदोलकांना ताब्यात घेतले. दुसरीकडे केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी आपले सरकार भाविकांबरोबर असल्याचे स्पष्ट केले आहे. ज्या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली आहे, ते अय्यप्पा भाविक नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. आंदोलन करणारे अय्यप्पांचे भक्‍त नाहीत. संघाचे स्वयंसेवक सन्निधनम येथे
आंदोलन करत आहेत. हिंसक परिस्थिती निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

-Ads-

शबरीमला येथे कोणालाही हिंसक परिस्थिती निर्माण करू दिली जाणार नाही, असे विजयन यांनी केरळमधील पत्रकारांच्या संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना सांगितले. केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्नानथनम यांनी आज निलाक्कल, पांबा आणि सन्निधानम येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. देशातील लाखो भाविक दरवर्षी अय्यप्पांच्या दर्शनासाठी येत असतात. मंदिराच्या परिसराला राज्य सरकारने युद्धभूमीचे स्वरुप प्राप्त करून दिल्याची टीका अल्फोन्स यांनी यावेळी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)