शबरीमला मंदिरात आणखी एका महिलेकडून दर्शन ; तणावात पडली भर

शबरीमला: श्रीलंकेची नागरीक असलेल्या एका 47 वर्षीय महिलेने गुरूवारी रात्री येथील अय्यप्पा मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने पुन्हा तेथे नव्याने तणाव निर्माण झाला आहे. आधीच्या घटनेमुळे तेथील वातावरण अजूनही तणावग्रस्तच असून आजही तेथे हिंसाचाराचे प्रकार घडले तसेच पोलिसांवर हल्ले आणि गावठी बॉंम्बचे हल्ले असे प्रकार घडले आहेत.

श्रीलंकेच्या महिलेने मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याच्या वृत्त्ताला पोलिसांनी आणि मुख्यमंत्री कार्यालयानेही दुजोरा दिला आहे. शशिकला असे या महिलेचे नाव आहे. ती तेथे गुरूवारी रात्री पोहचली. पोलिसांनी तिला तेथून हुसकाऊन लावण्याचा प्रयत्न केला पण अन्य उपस्थित भक्तांकडून कोणताच विरोध न झाल्याने त्या महिलेने आत जाऊन दर्शन घेतले. दरम्यान ती महिला आहे की पुरूष हे समजून न आल्याने तिला आत प्रवेश मिळाला असे काही जणांचे म्हणणे आहे. सदर महिलेने मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला होता असे तेथील सीसीटीव्ही फुटेजवरूनही दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शशिकला तेथे आपले पती सर्वानन आणि मुला समवेत दर्शनासाठी आली होती. तथापी तिला तेथे पुजा करू देण्यात आली नाही पण ती दर्शन घेऊन तेथून बाहेर पडली. तिच्या पती आणि मुलाला मात्र पुजा करता आली. आपण अय्यपाचे भक्त असून दर्शनासाठी आपण 41 दिवसांचे व्रत केले होते असेही तिने नमूद केले आहे. पत्रकारांशी बोलताना तिने आपल्याला आत जाऊन दर्शन घेता आले नाही असे म्हटले असले तरी केवळ सुरक्षेच्या कारणास्तव ती तसे म्हणत असावी असे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान आज सकाळी सहा वाजता कायल नावाची एक तृतियपंथीय व्यक्ती तेथे दर्शनासाठी आली होती पण त्या व्यक्तीलाही पोलिसांनी आत जाण्यापासून रोखले. चार तृतीयपंथीयांनी अलिकडेच काळी साडी परिधान करून तेथे दर्शन घेतले होते.

दरम्यान त्या परिसरात गुरूवारपासून दंगलीचे किंवा हिंसाचाराचे एकूण 801 प्रकार नोंदवले गेले असून त्या प्रकरणात एकूण 1369 जणांना अटक करण्यात आली आहे. 717 जणांना सुरक्षेचा उपाय म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)