शबरीमला भाविकांच्या आंदोलनाला अमित शहांचा पाठिंबा 

कन्नुर: शबरीमला मंदिराच्या संबंधात केरळातील भाविकांनी जे आंदोलन सुरू केले आहे त्याला भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पाठिंबा दर्शवला आहे. केरळातील मार्क्‍सवाद्यांचे सरकार बळाचा वापर करून तेथील भाविकांचा आवाज दाबून टाकत आहे असे त्यांनी म्हटले आहे.
शबरीमला मंदिरात सर्वच वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे पण त्या निर्णयाला तेथील भाविकांनी विरोध केला आहे. तथापी हा विरोध डावलून मार्क्‍सवादी सरकारने तेथील भाविकांवर बळजबरी सुरू केली असल्याचा आरोप आज शहांनी केला. या प्रकरणात सुमारे दोन हजार भाविकांची सरकारने धरपकड केली असून त्याचाही अमित शहा यांनी विरोध केला आहे. हे आंदोलन दाबून टाकण्याच्या मुख्यमंत्री विजयन यांच्या सरकारला त्याची भारी किंमत मोजावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या नावाखाली मुख्यमंत्र्यांनी भाविकांवरील दडपशाही थांबवावी अशी मागणीही त्यांनी केली.
ते म्हणाले की हिंदुंच्या श्रद्धेच्या नावावर आम्ही या सरकारला जुगार खेळू देणार नाही आणि हिंदुंच्या श्रद्धेचा त्यांना अवमानही करू देणार नाही असे ते म्हणाले. ते म्हणाले की देशात अन्यत्रही अय्यपा मंदिरे आहेत पण त्यातील कोणत्याही मंदिरात महिलांच्या दर्शनाला विरोध नाही. पण शबरीमलात हे जे वेगळेपण जपले जात आहे त्याचे संरक्षण होण्याची गरज आहे.
केरळातील मार्क्‍सवाद्यांनी मंदिरांच्या विरोधात कटकारस्थान करून कारवाई केली आहे. त्यांनी याद्वारे येथे आणिबाणीसारखी स्थिती निर्माण केली आहे. या सरकारने न्यायालयाच्या या आधीच्या अनेक निर्णयांची अंमलबजावणी केलेली नाही असा दावाही शहा यांनी केला. तथापी शबरीमला प्रकरणात लोकभावनांची कदर करून न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली पाहिजे असे त्यांनी नमूद केले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)