शबरीमला प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या रेहाना फातिमाला अटक 

कोची – शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्या रेहाना फातिमा यांना पथानामथिट्टा पोलिसांनी आज अटक केली आहे. केरळमधल्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

यासंदर्भात कोची येथील पथानामथिट्टा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अटकेची शक्‍यता असल्याने रेहाना फातिमा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळत पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानंतर पोलिसांनी रेहाना यांना मंगळवारी अटक केली. रेहाना फातिमाने केरळच्या शबरीमला मंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न ऑक्‍टोबर महिन्यात केला होता. या प्रयत्नानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंसाचारही उसळला होता. रेहाना फातिमा यांनी लाखो हिंदू भक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असा आरोप त्यावेळीही करण्यात आला होता.

-Ads-

दरम्यान, रेहाना फातिमा या मार्च 2018 पासून चर्चेत आहेत. कोझीकोड येथल्या एका प्राध्यापकाने केलेल्या एका विवादीत विधानानंतर, रेहाना यांनी त्यांचा एक फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर त्यांनी त्यांचा फोटो पोस्ट केला आणि तो प्रचंड ट्रोल झाला होता. त्यावरून त्यांना धमकीसुद्धा देण्यात आली होती आणि त्यानंतर तो फोटो काढून टाकण्यात आला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)