शबरीमला प्रकरण : कनकदुर्गा आज करणार घरात प्रवेश

केरळ – केरळमधील शबरीमला मंदिराची शेकडो वर्षांची परंपरा अखेर खंडित झाली होती. मंदिरात प्रवेश करण्याला होत असलेला विरोध डावलीत दोन महिलांनी शबरीमला मंदिरात भगवान अयप्पाचे दर्शन घेतले होते. बिंदू आणि कनकदुर्गा अशी या दोन महिलांची नावे आहे. यातील कनकदुर्गा या महिलेला त्यांच्याच कुटुंबीयांकडून त्रास सुरू झाला होता. तसेच  सासूने मारहाण केल्यानंतर रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतल्यानंतर त्यांच्यासाठी घराचा दरवाजाही बंद झाला होते. त्यांच्या घरातील इतर सदस्य दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले असून त्यांच्या सध्याच्या घराला कुलूप लागले होते. याबाबत घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत कनकदुर्गा यांनी याचिका दाखल केली होती. या प्रकणात आहे. आज न्यायालयाचे आदेश घेऊन कनकदुर्गा घरी परतल्या आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)