शबरीमला दर्शन प्रकरणावरून हिंसक प्रकार सुरूच

भाजप खासदाराच्या वडिलोपार्जित घरावर बॉम्ब हल्ला संघाच्या कार्यालयालाही लावली आग

कन्नुर: शबरीमला मंदिरात दोन महिलांनी दर्शन घेतल्यामुळे निर्माण झालेला तणाव अद्याप कायम असून आज पुन्हा अनेक भागात हिंसक प्रकार घडले आहेत. एका भाजप खासदाराचे वडिलोपार्जित घर गावठी बॉंम्ब टाकून उडवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला तर कुन्नुर येथील संघाचे ऑफिसही पेटवून देण्यात आले.

मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार ए. ए. एन शमसी आणि याच पक्षाचे कन्नुरचे नेते पी ससी या दोन नेत्यांच्या घरावर बॉंम्ब टाकण्याचे प्रकार घडले.भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा सदस्य व्ही मुरलीधरन यांचे थलासरीजवळील वडियील पीडिकिआ येथील वडीलोपार्जित घरही गावठी बॉम्ब फेकून उडवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

तथापि त्या घटनांत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. खासदार मुरलीधरन सध्या आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत तेथून पीटीआयशी बोलताना त्यांनी सांगितले की शनिवारी सकाळी ही बॉम्बफेक करण्यात आली त्यावेळी माझी बहीण, मेव्हणे आणि त्यांची कन्या घरात होती. परियाराम भागात असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालयही जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही जणांनी हे कार्यालय पेटवून दिले. तथापी त्याहीं घटनेत जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)