शपथविधीनंतर तीन महिन्यात ऍण्टी-हॅकिंग योजना आणणार

न्युयॉर्क – अमेरिकेचे नवे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शपथविधीनंतर 90 दिवसात ऍण्टी-हॅकिंग योजना आणणार आहेत. अमेरिका सायबर संपत्तीच्या सुरक्षेसाठी सज्ज नाही. यामुळे रशिया आणि चीन आपल्या ऑनलाईन प्रणाली ब्रेक करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ट्रम्प 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर तीन महिन्यात ते हॅकिंग विरोधी योजना आणणार असून देशातील सुरक्षेविषयी माहिती कोणता देश चोरू शकणार नाही. या हॅकिंगला थांबविण्यासाठी आपण अनेक योजना आखल्या आहेत, असे ते म्हणाले. ट्रम्प म्हणाले, राष्ट्रध्यक्षाचे पद सांभळल्यानंतर रशियाच्या मनात अमेरिकेबद्दल अधिक सन्मान निर्माण होणार आहे. आपल्याकडे रिसेट बटन नाही आहे. आपण सोबत चांगले असू किंवा नसू पण मी आशा करतो की, एकमेंकामध्ये चांगले संबंध निर्माण होतील, अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. याआधीही त्यांनी रशियाशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न करू असे सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)