शनैश्‍वर देवस्थानच्या महिला विश्‍वस्ताचा विनयभंग

नेवासा – शनीशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या महिला विश्‍वस्ताचा विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी विश्‍वस्त वैभव सुखदेव शेटे यांच्यासह 8 ते 10 जणांवर शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वैभव सुखदेव शेटे, सोमनाथ बापूसाहेब शेटे, एकनाथ भाऊसाहेब शेटे, नवनाथ भास्कर शेटे, मयूर जालिंदर देठे, बलभीम भाऊराव दाणे (सर्व रा.शनी शिंगणापूर ता.नेवासा)यांच्यासह 8 ते 10 जणांचा समावेश आहे.
महिला विश्‍वस्तांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि 31 जुलै 2018 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शनी मंदिर येथे प्रशासकीय कार्यालयात बैठक हॉलमध्ये बैठकीसाठी पती समवेत गेले होते. मागील महिन्यात झालेल्या उपोषण संदर्भातील कागदपत्रांच्या नकला रजिस्टर झेरॉक्‍स प्रति उपोषणकर्त्यांना देण्यासाठी ही बैठक सुरू होती. त्यावेळी मयूर देठे हा मोबाईलवर बैठकचे चित्रीकरण करीत होता. त्यावेळी सर्व विश्‍वस्त उपस्थित होते. दरम्यान त्याला मी तू चित्रीकरण करू नको’ असे म्हटले असता याचा त्याला व इतर जमलेल्या काही लोकांना राग आला. त्यावेळी मयूर जालिंदर देठे याने त्याचे हातातील मोबाईलचा कॅमेरा बंद केला असता वैभव शेटेसह 8 ते 10 जणांनी मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून हाताला धरून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. मला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. माझ्या हातावर मारल्याने हातातील बांगडीच्या काचा फुटून त्या हातात घुसल्या आहे. माझ्या पतीला ही धक्काबुक्की करून जिवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीमध्ये माझे गळ्यातील दागिने तुटून गहाळ झाले आहेत, असे महिला विश्‍वस्ताने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी विनयभंग तसेच मारहाणीचा गुन्हा शनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)