शनैश्वर देवस्थानकडून अन्नधान्य, कपड्याचे वाटप

 प.पु. नंदगिरी महाराजांच्या हस्ते कपडे, धान्य वाटप करण्यात आले.

पिंपोडे बु।। दि. 9 (प्रतिनिधी) – उत्तर कोरेगाव तालुक्‍यातील हरेश्वराच्या डोंगरामधून उगम असणाऱ्या वसना तीर सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती प.पु. नंदगिरी महाराजांच्या हस्ते गरजूंना अन्न-धान्य, कपडे आदींचे वाटप करण्यात आले. सोळशी, ता. कोरेगाव येथील तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थानच्या वतीने दरवर्षी गरजू कुटुंबाना दिवाळी निमित्त अन्न-धान्य, कपडे देवून गरिबांची दिवाळी गोड केली आहे. शनैश्वर देवस्थानकडून गरजूना मोफत वैद्यकीय सेवा, रक्तदान शिबिर, सार्वजनिक विवाह सोहळा, शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप, व्यसनमुक्त शिबिर, आरोग्य शिबीर, ग्रंथमहोत्सव असे विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. प. पु. नंदगिरी महाराज यांनी धार्मिक संस्कृती बरोबर सामाजिक, शैक्षणिकतेवर भर दिला आहे. यावर्षी ही सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी त्यांनी दिवाळीनिमित्त अन्नदान, धान्यवाटप, शालेय साहित्याचे वाटप करून अनेक कुटुंबाना मोलाचे सहकार्य केले आहे. दिपावली सणाचे औचित्य साधून प. पु. नंदगिरी महाराज, डॉ. अशोक कदम, बाळासाहेब यादव, डॉ. अनिल निकम, अविनाश लेंभे, अविनाश धुमाळ, तसेच शनिभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)