शनिवार वाड्यावरील कार्यक्रमास हायकोर्टाने परवानगी नाकारली 

मुंबई – स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाबाई भोसले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त पुण्याच्या शनिवार वाड्यात आयोजित कार्यक्रमाला परवानगी देण्यास गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयानेही नकार दिला. सामाजिक शांतता भंग होऊन कायदा सुव्यवस्थेचा मुद्यावर पुणे पोलिसांच्या परवानगी नाकारण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला.

स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन “देश बचाव आघाडीने केले होते. मात्र या कार्यक्रमात सामाजिक शांतता भंग होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल, या मुद्यावर पुणे पोलिसांनी परवानगी नाकरल्याने आयोजकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन परवानगी मिळावी म्हणून याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. विश्वजीत सावंत यांनी बाजू मांडताना सकाळी 11 ते रात्रौ 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, डॉ. बाबा आढाव यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.

तर न्यायव्यवस्था आणि संविधानावर आधारीत एका परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. मात्र या कार्यक्रमामुळे सामाजिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण पुढे करत पुणे पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असल्याने परवानगी द्यावी, अशी विनंती केली. मात्र न्यायालयाने पोलिसांच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यामुळे आयोजकांना अवघ्या दोन दिवसात कार्यक्रमासाठी पर्यायी जागा शोधण्याची वेळ आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)