विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
नेवासाफाटा – नेवासा तालुक्‍यातील देवगड
येथे त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासानिमित्त शनिवार दि.19 ते दि.26 मे या कालावधीत श्रीमद भागवत कथा व श्री दत्त लक्ष्मी नारायण याग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यात खामगाव (जि. बुलढाणा) येथील येथील भागवत कथाकार शंकर महाराज सुश्राव्य वाणीतून सकाळी 9 ते 12 या वेळेत भागवत कथा सांगणार असल्याची माहिती श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख भास्करगिरी महाराज यांनी दिली.
यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये पहाटे सनई वादन, काकडा व श्रींची आरती, सकाळी गितापाठ, विष्णूसहस्त्रनाम, 9 ते 12 भागवत कथा कार्यक्रम, दुपारी 3 ते 5 संगीत भजन, सायंकाळी 5 ते 7 हरिपाठ, सायं आरती, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन आदींचा समावेश आहे. याप्रसंगी येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख, उद्धव महाराज मंडलिक, बाबासाहेब महाराज इंगळे, रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, संदीपान महाराज हासेगावकर,डॉ. जयवंत महाराज बोधले, चैतन्य महाराज देगलूरकर यांची कीर्तनसेवा होणार आहे.
शनिवार दि.26 मे रोजी सकाळी 8 ते 10 यावेळेत भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे. अधिकमासा निमित्ताने आयोजित भागवत कथा श्रवनाचा भाविकांनी मोठया प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र देवगड संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)