शनिवारवाड्याचे भूमिपूजन आशुतोष गोवारीकरच्या हस्ते

आशुतोष गोवारीकरच्या सिनेमांमध्ये नेहमीच भव्य सेटवर विशेष भर दिलेला असतो. आपल्या ऐतिहासिक ड्रामा सिनेमांमध्ये भव्य सेटद्वारे वातावरण निर्मिती करण्यामध्ये आशुतोष कोणतीच कसर सोडत नाही. “लगान’ आणि “जोधा अकबर’ या आशुतोषच्या सिनेमांमध्ये आपण याचे प्रत्यंतर घेतले आहेच. आता आशुतोषचा आगामी सिनेमा “पानीपत’मध्येही याच भव्यतेचे दर्शन घडणार आहे.

या सिनेमासाठी संपूर्ण शनिवारवाडा जसाच्या तसा पुन्हा उभारण्यात येणार आहे. आशुतोष गोवारीकरने या नवीन शनिवारवाड्याच्या उभारणीची जबाबदारी प्रसिद्ध नेपथ्यकार नितीन देसाईवर सोपवली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहुर्तावर या शनिवारवाड्याच्या उभारणीच्या कामाला प्रारंभ देखील झाला आहे. आशुतोष गोवारीकरच्याच हस्ते या शनिवारवाड्याच्या सेटसाठी भूमिपूजनदेखील करण्यात आले.

आशुतोषने या प्रसंगाचा एक फोटो शेअर केला आहे. पानीपतच्या लढाईच्यावेळी शनिवारवाडा हे मराठ्यांच्या साम्राज्याचे केंद्र होते. याची भव्यता हीच याची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. मूळ शनिवारवाड्याचे क्षेत्रफळाइतकेच या सेटचेही क्षेत्रफळ असणार आहे. “पानीपत’मध्ये अर्जुन कपूर, संजय दत्त, कृती सेनन हे मुख्य भूमिकेत असणार आहेत.

फोटो टेम्पमध्ये पानीपत नावाने आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)