शनिवारवाडा ‘वाचवा’

बुरुजाबाहेर अश्‍लील प्रकार


सुरक्षेचा बोजवारा


अन्य ऐतिहासिक वास्तूंची अवहेलना सुरूच

पुणे – पुण्याचा इतिहास डोळ्यांपुढे आणला, तर छत्रपती शिवरायांनी पुण्यात फिरवलेला सोन्याचा नांगर आणि अटकेपार झेंडा रोवलेले पेशवे आठवतात. या इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू पुणे शहर आणि परिसरात आहेत. पेशव्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा शनिवारवाडा हा त्यातीलच एक. परंतु या वास्तूला अनेक वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींनी घेरल्याचे चित्र रोज दिसते.वाड्याबाहेरील बाजूला महापालिकेने बांधलेले लोखंडी रेलिंग ओलांडून, त्याचे कुलूप तोडून अश्‍लील चाळे करणारी मंडळी आत घुसतात. महापालिकेने नेमलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा बोजवाराच उडाल्याचे यातून सिद्ध होत आहे.

शनिवारवाड्याबाहेरील रेलिंगच्या आतील भागात फुलझाडांनी सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाची परवानगी मिळाली आहे. यासाठी भवन विभागाला मिळालेल्या बजेटमधून तरतूद केली जाणार आहे. आगीामी पावसाळा सुरू होण्याआधी याची निविदाप्रकिया करण्याचा प्रयत्न आहे. या रेलिंग्जना कुलूप लावूनही अनेकदा ती तोडली जातात. सुरक्षा रक्षकांची संख्या कमी आहे. याबाबत संबंधित विभागाला पत्र लिहिणार आहे. क्षेत्रीय कार्यालयालाही स्वच्छतेबाबत कळवले जाईल.
– सुनील मोहिते, वारसा विभाग, मनपा.

सुरक्षारक्षक असमर्थ
शनिवारवाड्याची ऐतिहासिक वास्तू ही भर वस्तीत आहे. वास्तूच्या दोन्ही बाजूला मोठे रस्ते सतत वाहते असतात. अशा परिस्थितीतही शनिवारवाड्याच्या तीन बाजूने महापालिकेने बांधलेल्या रेलिंगचे कुलूप तोडून अनेक प्रेमीयुगुल सर्रास आत घुसतात आणि अश्‍लील चाळे करतात. शनिवारवाड्याच्या वास्तूमध्ये जाण्यासाठी शुल्क भरावे लागते. तसेच तेथे वाईट प्रकार करताना दिसल्यास हटकले जाते. मात्र बाहेरील रेलिंगबाजूला चाललेले प्रकार थांबवण्यास सुरक्षारक्षक असमर्थ ठरतात.

प्रशासनाचे दुर्लक्ष
शनिवारवाड्याची अंतर्गत देखभाल दुरुस्ती ही केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येते. परंतु शनिवारवाड्याचे पटांगण, त्यामध्ये बांधलेला स्टेज, दर्शनी भाग वगळता इतर तिन्ही बुरुजाच्या पलिकडे रस्त्यावर असलेला बुरुजाबाहेरच्या भागाची देखभाल महापालिका क्षेत्रीय कार्यालयाकडे आहे. मात्र, त्यांच्याकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. सुरक्षारक्षकांची संख्याही अपुरी आहे.

लोखंडी रेलिंग फक्‍त शोभेपुरते
अस्वच्छता, कचऱ्याचे साम्राज्य हा प्रकार तर आहेच, परंतु कोणीही आत जाऊन ऐतिहासिक वास्तूला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवू नये, यासाठी महापालिकेने काही वर्षांपूर्वी केंद्रीय पुरातत्त्व खात्याची परवानगी घेऊन येथे बाजूला लोखंडी रेलिंग बसवले होते. याला दरवाजाही करण्यात आला होता. याला कुलूप लावले जात. साफसफाईवेळी त्या गेटचा उपयोग होता. मात्र कितीही वेळा त्याला कुलूप लावल्यास ती चोरली किंवा तोडली जात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)