शनिपार चौकातील दोन दुकाने फोडली

पुणे, दि. 6- शनिपार चौकातील दोन दुकानांचा लोखंडी दरवाजा उचकटून चोरट्यांनी रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. खलील उर रेहमान खत्री (34, रा. रविवार पेठ) यांनी यासंदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिपार चौकात खत्री यांचे फॅब्रिक वर्ल्ड नावाचे कपड्यांचे दुकान आहे. चोरट्यांनी मध्यरात्री खत्री यांच्या दुकानाचा लोखंडी दरवाजा उचकटून 30 हजार रुपयांची रोकड लांबविली. या परिसरात किरण वणवे यांचे रिच लुक मेन्स पार्लर केशकर्तनालय आहे. चोरट्यांनी वणवे यांच्या दुकानाचा दरवाजा उचकटला. गल्ल्यातील 4 हजार रुपयांची रोकड लांबविली. दोन्ही दुकानांमधील एकूण मिळून 34 हजार रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. गजबजलेल्या शनिपार चौकातील दुकाने फोडल्याची घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर व्यापारीवर्गात घबराट उडाली आहे. पोलिसांकडून या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एम. रायकर तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)