शत्रू राष्ट्रांकडून घेतले पैसे; ‘या’ नेत्याला घेतले ताब्यात

पॅरिस : सन २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रचारासाठी लिबियाकडून आर्थिक मदत घेतल्याचा ठपका ठेवत फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस साकरेझी यांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.

साकरेझी आणि त्यांच्या नेत्यांना निवडणूक प्रचारासाठी लिबियाचा नेता मौमर कदाफी आणि त्याचा मुलगा सैफ अल-इस्लाम यांनी पैसे पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. २०१३ मध्ये याचा तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी साकरेझी यांना नोटीस देखील पाठवल्या होत्या. मात्र त्यावर काहीही उत्तर देण्यात आले नव्हते. याच प्रकरणात काही आठवडय़ांपूर्वी अलेक्झांडर जौऱ्ही यांना लंडनमधून ताब्यात घेण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)