शत्रू मालमत्तेतंर्गत ३ हजार कोटींच्या समभागांची विक्री

फाळणीनंतर पाकिस्तानात गेलेल्या नागरिकांची मालमत्ता ही शत्रू मालमत्ता म्हणून ओळखली जाते. अशा प्रकारची मालमत्ता भारतात मोठ्या प्रमाणात असून सरकारने या मालमत्तेचे शेअर विकण्याचा निर्णय घेतला आहे. यातून निधी उभा करून तो पैसा विकास कामासाठी मार्गी लावण्याचा सरकारचा मानस आहे.

आगामी काळात सरकार शत्रू मालमत्तेतंर्गत सुमारे 996 कंपन्यांचे सुमारे साडे सहा हजार कोटींच्या शेअरची विक्री करणार आहे. अलीकडेच कॅबिनेटच्या बैठकीत विक्री प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली. या शेअरची सध्याची किंमत सुमारे 3 हजार कोटी रुपये इतकी आहे. या शेअरच्या विक्रीतून जमा झालेला पैसा विकास आणि सामाजिक उपक्रमासाठी वापरण्यात येणार आहे. त्याच्या विक्रीचे काम अर्थ मंत्रालयाचे गुंतवणूकदार आणि पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट विभागाच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. तसे म्हटलं तर स्वातंत्र्यानंतर देश सोडून पाकिस्तानात गेलेल्या हजारो नागरिकांची चल आणि अचल मालमत्ता ही शत्रू मालमत्तेतंर्गत येते. या मालमत्तेचे प्रमाण उत्तर भारतात अधिक आहे. विशेषत: पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, मुंबई, राजस्थान आदी ठिकाणी या मालमत्तेच्या मालकीवरून सुरू असलेला वाद बऱ्याच काळापासून प्रलंबित होता. मात्र सध्याच्या केंद्र सरकारने विधेयक मंजूर करून देशातील सर्व अचल मालमत्तेला सरकारी मालकी असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार मालमत्तेच्या शेअर विक्रीतून सरकारने पैसा उभा करण्याचा विचार केला आहे.

-Ads-

– अपर्णा देवकर


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)