शत्रूला धडकी भरवणारे चिनुक हेलिकॉप्टर्स भारतीय वायू सेनेत दाखल

चंदिगढ – अमेरिकन बनावटीचे CH-47F (I) चिनुक ही शक्तीशाली हेलिकॉप्टर्स आजपासून भारतीय वायू सेनेत दाखल. चंदिगड येथे एका कार्यक्रमाद्वारे या हेलिकॉप्टर्सचे राष्ट्रार्पण झाले. या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय हवाई दलाची क्षमता आणखी वाढली आहे. या कार्यक्रमासाठी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ, वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ, एअर मार्शल आर. नांबियार उपस्थित होत.

अमेरिकेची हवाई क्षेत्रातील कंपनी बोईंग आणि भारत सरकार यांच्यात १५ चिनुक आणि  २२ अपाचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याबाबत करार करण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या खेपेत ४ चिनुक हेलिकॉप्टर्स आज भारतीय वायू सेनेत दाखल झाले आहेत.

चिनुक हेलिकॉप्टर हे यूएस आर्मीची ताकद म्हणून ओळखले जाते. हे एक मल्टीमशीन श्रेणीचे हेलीकॉफ्टर असून तब्बल १०,००० किलोग्राम वजन उचलू शकते. ३०० किमी प्रति तास या वेगाने हवेतून मार्गक्रमण करण्याची क्षमता यामध्ये आहे. चिनुक हेलिकॉप्टर हे मैदानी लढाईसाठी अत्यंत सक्षम असून सैन्याच्या वेगवान हालचाली करण्यासाठी तसेच, एकाच वेळी मोठा शस्त्रसाठा वाहून नेण्याची क्षमता या मध्ये असल्यामुळे खडतर सिमावर्ती भागात सैनिक, दारुगोळा, इंधन आणि इतर रसद याची ने-आण करण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहे.

चिनुक याच हेलिकॉप्टरचा वापर यूएस आर्मीच्या नेव्ही सील सैनिकांनी करत अबोटाबाद येथील ओसामा बिन लादेन वर कारवाई केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)