शत्रुघ्न सिन्हा यांनी रूग्णालयात घेतली लालूंची भेट

पाटणा – भाजपचे खासदार आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी आज रांचीमधील रूग्णालयात राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची भेट घेतली. यावेळी सिन्हा यांनी लालूंचा उल्लेख सर्वांत लोकप्रिय भूमिपुत्र आणि लोकनेता अशा शब्दांत केला.

चारा घोटाळ्याशी संबंधित आणखी एका प्रकरणात लालूंना शिक्षा ठोठावण्यात आल्याच्या दिवशीच ही घडामोड घडली. याआधीच तुरूंगात रवानगी झालेल्या लालूंना प्रकृती ठीक नसल्याने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, लालूंच्या भेटीवेळी सिन्हा यांच्या समवेत कॉंग्रेसचे स्थानिक खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय होते. या घडामोडींमुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मागील काही काळापासून सिन्हा स्वपक्षावर आणि मोदी सरकारवर विविध मुद्‌द्‌यांवरून निशाणा साधत आहेत.

त्यामुळे आगामी काळात सिन्हा वेगळ्या राजकीय वाटेवरून चालणार का, असा प्रश्‍न सातत्याने उपस्थित होत आहे. लालू-सिन्हा भेटीच्या दिवशीच बिहारमधील जेडीयू-भाजप युती सरकारने बिहार दिवसानिमित्त आयोजित केलेल्या तीन दिवसीय समारंभाचा समारोप झाला. या समारंभाचे निमंत्रण देण्यात न आल्याने सिन्हा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)