शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला काले येथे ‘रयत ज्योत’ प्रज्वलन

काले : रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला रयत ज्योत प्रज्वलन कार्यक्रमात सर्व ग्रामस्थ.

माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या स्मृतींना उजाळा
कराड, दि. 4 (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेलेल्या काले ता. कराड येथील ग्रामस्थांच्या वतीने ‘रयत ज्योत’ प्रज्वलन करून शताब्दी वर्षाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी महात्मा गांधी विद्यालयाच्या अनेक माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून कर्मवीर आण्णांच्या तसेच शाळेच्या जुन्या स्मृतींना उजाळा दिला. महात्मा गांधी विद्यालयाचे पहिले विद्यार्थी असणारे रामचंद्र कोळी यांच्यासह अनेक माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
काले येथे कर्मवीर आण्णांनी महात्मा गांधी विद्यालयच्या माध्यमातून रयत शिक्षण संस्थेचे रोपटे लावले. आज त्याला वटवृक्षाचे स्वरूप निर्माण झाले असून संस्थेच्या शताब्दी वर्षास प्रारंभ झाला आहे. आण्णांनी काले येथील वसतिगृहात संस्थेची स्थापना केली. त्याच ठिकाणी काले ग्रामस्थांच्या वतीने रयत ज्योत प्रज्वलित करण्यात आली. महात्मा गांधी विद्यालयाचे पहिले विद्यार्थी असणारे माजी प्राचार्य रामचंद्र कोळी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती लावून आण्णांच्या व शाळेच्या आठवणी जाग्या केल्या. ग्रामस्थांच्या वतीने रयतज्योतची गावातून मिरवणूक काढण्यात आली. तसेच शताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. 5 रोजी गावातून चित्ररथ काढण्यात येणार आहे. यात कर्मवीर आण्णा, शिवाजी महाराज, महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू तसेच इतर लोकप्रतिनिधींचे वेष परिधान करून महात्मा गांधी विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच या चित्ररथांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रविवार दि. 7 रोजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला असून सोमवार दि. 8 ऑक्टोबर पासून कर्मवीर आण्णा यांच्या जयंतीनिमित्त सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. हे कार्यक्रम होईपर्यंत वसतिगृहामध्ये रयतज्योत प्रज्वलित ठेवण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)