‘शताब्दी एक्सप्रेस’ची जागा ‘ट्रेन 18’ घेणार ?

मुंबई : देशभरात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीदेखील अनेकजण रेल्वेची निवड करतात याकरिता अनेक रेल्वे कडूनही अनेक प्रकारच्या ट्रेन उपलब्ध आहेत. मात्र त्यापैकी ‘शताब्दी एक्सप्रेस’ ट्रेन बंद होणार असून लकरच त्याची जागा ‘ट्रेन 18 ‘ घेण्याची शक्यता आहे. ‘ट्रेन 18’ ही वेगवान ट्रेन आहे. या ट्रेनचा वेग 160 किमी प्रति तास आहे. यामध्ये वर्ल्ड क्लास सुविधा देण्यात आल्यात आहेत.

पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया प्रोजेक्टद्वारा ‘ट्रेन 18’ ची निर्मिती करण्यात आली आहे. या ट्रेनची निर्मिती चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्ट्रीद्वारा करण्यात आली आहे. आइसीएफनुसार इतर देशात तयार होणार्‍या इतर ट्रेनच्या तुलनेत ‘ही’ ट्रेन निम्म्या किंमतीमध्ये तयार करण्यात आलेली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ट्रेनमध्ये 16 चेअर कार कोच आहेत. ट्रेनमध्ये ‘एक्झिक्युटीव्ह’ आणि ‘नॉन एक्झिक्युटीव्ह’ असे दोन कोच आहेत.

एक्झिक्युटीव्ह चेअर क्लासमध्ये 56 यात्री बसण्याची क्षमता आहे. तर नॉन एक्झिक्युटीव्हमध्ये 78 जणांसाठी बसण्याची आसनव्यवस्था आहे. ही ट्रेन पूर्णपाणे वातानुकूलित असून त्यामध्ये वाय फायचीदेखील सोय आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ‘ट्रेन 18’ मध्ये यात्रेकरूंना इंटरनेटची सोय देण्यात आली आहे. संपूर्ण ट्रेनमध्ये वायफायची सोय आहे. सोबतच या ट्रेनमध्ये झिरो डीस्चार्ज बायो वॅक्युम टॉयलेटची सोय आहे. ट्रेनच्या दोन्ही बाजुला ड्रायव्हिंग केबिनची सोय आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)