शतपावली करताना मंगळसूत्र लंपास

पिंपरी – शतपावलीसाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याची चैन असा एक लाख 20 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बावधन येथील युनिकस सोसायटीसमोर घडली.

सरिता दत्तात्रय कुलकर्णी (वय-60, रा. एमएलडी गार्डनजवळ, मराठा मंदिर मागे, बावधन) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोटारसायकलवरील अज्ञात दोन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-

सरिता आणि त्यांचे पती शतपावली करत होते. युनिकस सोसायटीसमोर दोनजण दुचाकीवर थांबले होते. सरिता आणि त्यांचे पती चालत येताना दिसताच आरोपींनी त्यांची दुचाकी सरिता आणि त्यांचे पती यांच्यामध्ये घातली. दुचाकीवर मागे बसलेल्या एका इसमाने सरिता यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याची चैन हिसकावली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)