‘शतदा प्रेम करावे’मध्ये स्नेहाच्या जागी झळकणार ज्ञानदा !

अल्लड प्रेमाची अबोल गोष्ट उलगडणारी छोट्‌या पडद्यावरील ‘शतदा प्रेम करावे’ ही मालिका खूपच लोकप्रिय होत आहे. आता या मालिकेत एक ट्‌विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेत सायली या भूमिकेत स्नेहा शहाच्या ऐवजी ज्ञानदा रामतीर्थकर ही अभिनेत्री झळकणार आहे. अल्लड, अवखळ असलेली सायलीची भूमिका ज्ञानदा कशी साकारणार? हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

उन्मेष आणि सायली यांच्या नात्याला आता प्रेमाची किनार लाभते आहे. मात्र, सायलीची भूमिका साकारणारी स्नेहा शहा काही कारणाने या मालिकेत काम करू शकणार नसल्याने तिची जागा आता ज्ञानदा घेणार आहे. याबद्दल विचारले असता ज्ञानदा म्हणाली, “शतदा प्रेम करावे’ची कथा खूपच इंटरेस्टिंग आहे. मालिकेसाठी मला विचारणा झाल्यावर मी लगेच होकार दिला”. आता उन्मेष आणि सायलीच्या नात्याचे पुढे काय होणार आणि सायलीची भूमिका ज्ञानदा कशी साकारणार याकडे प्रेक्षकांचे डोळे लागले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)