शतकवीर पुजाराच्यानावे संथ खेळीचा विक्रम

मेलबर्न: भारतीय कसोटी क्रिकेट संघातील नवी वॉल ठरत असलेल्या चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात झळकावलेले शतक लक्षवेधी ठरले असून शतकवीर पुजाराच्यानावे संथ खेळीचा विक्रम देखिल या शतकाने झाला आहे. पुजाराचे हे शतक ऑस्ट्रेलियाच्या भूमीवरील भारतीय फलंदाजांने ठोकलेले तिसऱ्या क्रमांकाचे संथ शतक ठरले आहे.

भारतीय संघाने पहिल्या दिवसअखेर 2 बाद 215 धावा केल्या होत्या. त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पुजाराने उपहाराच्या विश्रांतीआधी दमदार शतक ठोकले. 280 चेंडूत अत्यंत संयमी खेळी करत त्याने आपले शतक झळकावले. त्याने केलेले हे शतक त्याच्या आतापर्यंत केलेल्या 17 कसोटी शतकांतील सर्वात संथ शतक ठरले. याआधी त्याने इंग्लंडमध्ये सर्वात संथ शतक ठोकले होते. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या भूमीत हे तिसरे संथ शतक ठरले. सध्याचे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी 1992 साली सिडनीच्या मैदानावर 307 चेंडूत शतक ठोकले होते. तर सुनील गावसकर यांनी 1985 साली अडलेड च्या मैदानावर 286 चेंडूत शतक लगावले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)