शटर उचकटून चोरी करणारे जेरबंद

शटर उचकटून चोरी करणारे जेरबंद
सुमारे लाखभराचा ऐवज हस्तगत
पुणे, दि. 10 – दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना खडक पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 99 हजार 500 रूपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
लतिफ शेख (19, रा. कासेवाडी), अमन समीर शेख (18 वर्षे 3 महिने) आणि टेडा अमन उर्फ फारूख शाबीर रंगरेज (27, रा. कासेवाडी, भवानी पेठ) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी इजाज ख्वाजा शेख (36, रा. कासेवाडी) यांचे साऊंड सिस्टीम व डेकोरेशनचे साहित्याचे कासेवाडी येथे दुकान आहे. या दुकानाचे शटर उचकटून 65 हजार रूपये किंमतीचे साऊंडचे साहित्य चोरून नेण्यात आले होते. यासंदर्भात खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या अनुशंगाणे तपास करता मिळालेल्या खबरीवरून तिघांनाही अटक करण्यात आली.
त्यांच्याकडे तपास करता त्यांनी त्यांनी या गुन्ह्याबरोबरच टिळक रस्त्यावरील रेमंडचे दुकान फोडून त्यातील रोख रक्‍कम चोरल्याचीही कबूली दिली. तसेच आरोपी लतिफ शेख याने शंकरशेठ रोड व बुधवार पेठ येथून मोपेड व हिरोहोंडा चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून दोन घरफोडीचे व दोन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कामगिरी परिमंडळ एकचे उपायुक्‍त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार व कर्मचारी विश्‍वनाथ शिंदे, विनोद जाधव, शाम लोहोमकर, इम्रान नदाफ, संदीप कांबळे, गणेश माळी, समीर माळवदकर, राकेश क्षीरसागर, आशिष चव्हाण, तानाजी सरडे यांच्या पथकाने केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)