शटडाऊन समाप्त करण्यासाठी आज अमेरिकन सीनेटमध्ये मतदान

file photo

वॉशिंग्टन (अमेरिका): गेला सुमारे महिनाभर चाललेला आंशिक शटडाऊन समाप्त करण्यासाठी अमेरिकन सीनेटमध्ये मतदान होणार आहे. मेक्‍सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या 5.7 अब्ज डॉलर्सच्या मागणीवर सहमती झाली नाही. त्यामुळे 22 डिसेंबरपासून आंशिक शटडाऊन चालू आहे. परिणामी सुमारे एक चतुर्थांश सरकारी विभागांचे काम काम ठप्प झाले आहे, आणि आठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर बेकारी ओढवली आहे. शटडाऊन समाप्त करण्यासाठी मतदान घेण्यावर सिनेटर्समध्ये सहमती झालेली आहे.

बहुमत असलेले नेते मिच मॅककॉनेल आणि डेमॉक्रेटिमचे नेते चक शुमर यांनी दोन ठरावांवर मतदानाबाबत समझोत्याची घोषणा केली आहे. पहिला ठराव बंद असलेल्या सर्व सरकारी विभागांसाठी सप्टेंबरपर्यंत निधीची तरतूद करण्याबाबत आहे. यात मेक्‍सिको सीमेवरील भिंतीसाठी निधीची तरतूद करण्याच्या ठरावाचा समावेश आहे. दुसरा ठराव आठ फेब्रुवारीर्यंत सरकारला निधीची तरतूद करण्यासाठी अस्थायी उपायांबाबत आहे. यापैकी कोणताही ठराव मंजूर होण्यासाठी 100 पैकी 60 मतांची आवश्‍यकता आहे, आणि हे सध्याच्या परिस्थितीत कठीण दिसत आहे.
अल्पकालीन ठरावासाठी रिपब्लिकन तयार होण्याची शक्‍यता कमी असून ते तयार झाले, तरी त्याला ट्रम्प राजी होणार नाहीत. मात्र यामुऴे सरकारी कामकाज सुरू करून सीमा सुरक्षेबाबत चर्चा करण्याची संधी मिळणार आहे, असे एका डेमॉक्रेटिक नेत्याने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)