शक्ती मिल बलात्कार प्रकरणी 14 जानेवारीपासून अंतिम सुनावणी 

मुंबई – शक्तीमिल बलात्कार प्रकरणी फाशीची शिक्षा सुनाविण्यात आलेल्या तिघा आरोपींनी कायद्यातील सुधारणेला दिलेल्या आव्हान याचिकेची उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने याचिकेवर 14 जानेवारीपासून अंतिम सुनावणी घेण्याचे निश्‍चित केले.

मुंबई सेंट्रल येथील शक्तिमिल कंपाऊंडमध्ये 22 ऑगस्ट 2013 साली महिला छायाचित्रकार आपल्या सहकाऱ्यासोबत गेली असता तिच्यावर पाच नराधमांनी बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करून खटला दाखल केला. सत्र न्यायालयाने सिराज खान याला जन्मठेपेची व इतर तिघा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.

-Ads-

त्यापैकी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी याने सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दिल्ली गॅंग रेपनंतर केंद्र सरकारने कलम 376(ई) या कायद्यात सुधारणा करत संबंधित आरोपीने दोनवेळा बलात्काराचा गुन्हा केल्यास त्याला जन्मठेपेची अथवा फाशीची शिक्षा ठोठावू शकतो, अशी तरतूद केली. कायद्यातील या सुधारणेलाच तिघा आरोपींनी आव्हान दिले आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी खंडपीठाने याचिकेची अंतिम सुनावणी 14 जानेवारीला निश्‍चित केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)