शंभू महादेव शुगर विरोधात शेतकरी एकवटले

साखर संकुलसमोर अन्नत्याग आंदोलन : ऊसबिलासाठी शेतकरी कामगार पक्ष आक्रमक

पुणे – उस्मानाबाद जिल्ह्यातील शंभू महादेव शुगर इंडस्ट्रीजने गाळप झालेल्या उसाचे पैसे त्वरित शेतकऱ्यांना द्यावेत या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने साखर संकुल येथे अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला आजपासून सुरवात करण्यात आली. यावेळी संघटनेच्या वतीने साखर आयुक्‍तालयाला निवेदन ही देण्यात आले. या आंदोलन ज्या शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत. ते सुद्धा सहभागी झाले आहेत. साखर कारखान्याने 2017-18 च्या गळीत हंगामामध्ये तब्बल 59 हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे.

तरी सुद्धा एकाही शेतकऱ्याचे गळीप हंगामाचे पैसे अद्याप दिलेले नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आला आहे. याबाबत वारंवार कारखान्याच्या संचालकांकडे तक्रारी करुनही दाद न मिळाल्याने अखेर साखर संकुल कार्यालयात आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे. आजपासून हे अन्नत्याग आंदोलन सुरु करण्यात आले आहे. आयुक्‍तालयाकडून ठोस निर्णय होत नाही. तोपर्यत हे आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे सदस्य भाई मोहन गुंड यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)