शंभू भक्तांकडून नरेश्वर महाराजांना कावडीने जलाभिषेक

शिक्रापूर-कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील शंभूभक्तांनी भीमा नदीवरून कावडीतून टाळमृदंगाच्या गजरात पाणी आणून नरेश्वर महाराजांच्या पिंडीवर जलाभिषेक करून भंडारा घालण्यात आला.
कोरेगाव भीमा येथील शंभूभक्तांनी भीमा नदीपात्रातून पाण्याची कावड घेऊन प्रथम पूजा केल्यानंतर कावडीची ग्रामप्रदक्षिणा घातली. गावापासून तीन किलोमीटर डोंगरावर असलेल्या नरेश्वर महाराज मंदिरातील पिंडीस कावडीतून आणलेल्या पाण्याने जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी माजी सरपंच विजय गव्हाणे, माजी ग्रामपंचायत सदस्य बबनराव गव्हाणे, उमेश गव्हाणे पाटील, माजी तंटामुक्ती अध्यक्ष केशव फडतरे, माजी चेअरमन उत्तम गव्हाणे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, कचरू ढेरंगे, राजाराम भोंडवे, मधुकर कंद, हरिभाऊ झुरुंगे, अनिल कुंभार, भामाबाई गव्हाणे, विमल सव्वाशे, भाग्यश्री गोसावी व अनेक शंभूभक्त कावड प्रस्थानास उपस्थित होते. नरेश्वर महाराजांच्या पिंडीवर अभिषेक केल्यानंतर ग्रामस्थांनी भंडारा आयोजित केला होता. या वेळी रोहिदास सव्वाशे, माजी ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर गव्हाणे, शिरूर हवेली दिंडीचे संचालक दिलीप ढेरंगे, बाळासाहेब भांडवलकर, दत्तात्रय चव्हाण, तानाजी काशिद, सोपान कुंभार व ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)