पिंपरी- शंभर रुपयांसाठी तरुणाला मारहाण केल्याची घटना काळेवाडी येथे रविवारी (दि.9) रात्री अकरा वाजता घडली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक केले आहे. श्रीधर लक्ष्मणराव महेंद्रकर (वय28 रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्यानुसार वाकड पोलिसांनी अशोक महादेव जाधव (वय-20 रा.कोकणे नगर, काळेवाडी) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याचे काळेवाडी परिसरात इलेक्‍ट्रॉनीकचे दुकान आहे तर फिर्यादी याचे तेथेच चायनीज खाद्य पदार्थाची गाडी आहे. या दोघांचीही एकमेकांशी ओळख आहे. यावेळी आरोपी याने महेंद्रकर याच्याकडे शंभर रुपये मागितले. मात्र माझ्याकडे पैसे नाहीत असे महेंद्रकर सांगितले मात्र मला पैसे का दिले नाहीत म्हणून त्या दोघांमध्ये वाद जाला व फिर्यादिला मारहाण करण्यात आली. यावरुन वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)